Vidhan Sabha 2019 : रणांगण शांत होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 19 October 2019

‘बसप’चे उमेदवार अधिक
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ३ हजार २३७ उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, बहुजन समाज पक्ष (बसप) जास्तीत जास्त जागा लढवत आहे. बसप २६२; तर भाजप १६४ जागांवर लढत आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी १६, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आठ जागांवर लढत आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस १४७, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) १०१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १२१ जागांवर निवडणूक लढवित आहेत. शिवसेना १२५ जागा लढवत आहे. यामध्ये अपक्षांची संख्या १४०० आहे. ३००१ पुरुष आणि २३५ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. यंदा निवडणूक प्रचारात देशपातळीपासून राज्यस्तरावरील सर्व नेत्यांनी सहभाग घेतला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच राज्यभरात सभा घेत आहेत. काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी, राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशातील नेते जोतिरादित्य शिंदे, केंद्रीय नेते आनंद शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली.

भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री आणि अन्य राज्यांतील भाजप नेत्यांनी राज्य पिंजून काढले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, ‘रिपाइं’चे रामदास आठवले आदी नेत्यांनी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या.

निवडणूक आघाडीवर

  • आदित्य ठाकरेंचा वरळीत मॉर्निंग वॉक
  • नागपूरमध्ये निवडणुकीसाठी परराज्यातील होमगार्ड
  • ज्योतिरादित्य शिंदे यांचे कोल्हापुरात यूथ कनेक्‍ट
  • नाशिकमध्ये शरद पवार एचएएल कर्मचाऱ्यांच्या भेटीस
  • नांदेडमध्ये अभिनेत्री अमिषा पटेल हिचा रोड शो

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 publicity stop politcs