Vidhan Sabha 2019 : तुमची ताकद ओळखा अन्‌ निर्णय घ्या - राज

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

‘तुमच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणारा निर्णय घेण्याची संधी पाच वर्षांनी येते. आता जर सुज्ञपणे मतदान झाले नाही, तर निर्दयी बहुमत तुम्हाला चिरडून टाकेल. तेव्हा मतदानाला जाण्यापूर्वी हे ऐका. तुमची स्वतःची ताकद ओळखा आणि निर्णय घ्या,’’ असे आवाहन राज ठाकरे यांनी या ऑडिओ क्‍लिपमधून केले. राज यांनी या ऑडिओ क्‍लिपच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांवरही हल्ला चढवला आहे.

विधानसभा 2019 : मुंबई - ‘तुमच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणारा निर्णय घेण्याची संधी पाच वर्षांनी येते. आता जर सुज्ञपणे मतदान झाले नाही, तर निर्दयी बहुमत तुम्हाला चिरडून टाकेल. तेव्हा मतदानाला जाण्यापूर्वी हे ऐका. तुमची स्वतःची ताकद ओळखा आणि निर्णय घ्या,’’ असे आवाहन राज ठाकरे यांनी या ऑडिओ क्‍लिपमधून केले. राज यांनी या ऑडिओ क्‍लिपच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांवरही हल्ला चढवला आहे.

सक्षम विरोधी पक्ष बनवा, असे आवाहन करत विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता राज्यातील मतदारांना ऑडिओ क्‍लिपच्या माध्यमातून साद घातली. ‘या वेळची परिस्थिती गंभीर आहे. गाफील राहू नका,’ असा सावध इशारा देतानाच, ‘तुमचा आवाज विधानसभेत पाठवायची हीच वेळ आहे’ अशी साद त्यांनी घातली. येत्या २१ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाला जाण्यापूर्वी माझे मतदारांना एक आवाहन आहे, ते तुम्ही जरूर ऐका, असे त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 Raj thackeray politics