raj thackeray
sakal
मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंत नोंद झालेल्या मतदारांची यादी निश्चित केली असली तरी त्यापैकी दहा लोकसभा मतदारसंघात तब्बल नऊ लाख ४१ हजार ७५० मतदारांची दुबार नोंद झाली असल्याचा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारच्या सभेत केला. दुबार मतदारांच्या याद्यांचे गठ्ठेच त्यांनी आज सभास्थानी आणले होते.