Maharashtra Weather Alert
esakal
Summary
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.
पालघर व ठाणे जिल्ह्यात मुसळधार, रायगडमध्ये हलका आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट — कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता.
राज्यात मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान आहे, दरम्यान हवामान विभागाने 8 ऑक्टोबर रोजी पावसाचा अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.