

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची, तसेच गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
esakal
IMD Forecast Maharashtra : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने थंडीची लाट ओसरली आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ होत आहे. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची, तसेच गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात आज राज्याचे नीचांकी ८.५ अंश तापमान नोंदले गेले.