

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर कर्नाटक ते मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वाहणारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. सोमवारी वर्धा जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. Maharashtra Weather Alert Thunderstorms Rain and Heatwave Warning Issued