

Cloudy skies and rainfall over Maharashtra as IMD issues weather alert for unseasonal rain and strong winds.
esakal
राज्यात सध्या थंडी कमी झाली असून ढगाळ वातावरण कायम आहे. काल (२७ जानेवारी) अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. आजही किनारी भागासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत गारठा वाढला असून, किमान तापमान १६-१८° सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मात्र पावसामुळे तापमानात चढ-उतार कायम राहणार आहे.