

Dark clouds over Maharashtra skies with lightning strikes
esakal
Yellow Alert Issued Across Multiple Districts in Maharashtra : राज्यात उष्ण आणि दमट हवामान कायम असतानाच काही भागांत पावसासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे. हवामान विभागाने आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.