

Cyclone Murasu Impact Weakens in Maharashtra
esakal
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळाचा प्रभाव आता कमी झाला असून, राज्यातील पावसानेही माघार घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, आज (ता. ६) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा