

Maharashtra Weather Forecast for October 19
esakal
महाराष्ट्रात बदलत्या हवामानामुळे काही भागांत पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये कोरडे आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. आज, सोमवार (१९ ऑक्टोबर) रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्टचा इशारा असून, उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाचा विशेष इशारा नसल्याने उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.