

Summary
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात वर्षअखेरीस थंडी कायम आहे.
नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुढील ४ दिवस राज्यभर थंडी टिकून राहणार आहे.
Maharashtra Weather Forecast : उत्तरेतून थंड वारे वाहत असल्याने राज्यात वर्षअखेरीस थंडी कायम आहे, मात्र थंडीचा जोर वाढणार असून नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमाल तापमानात देखील वाढ-घट कायम राहण्याची शक्यता आहे.