

Maharashtra Weather Forecast After Diwali
esakal
Maharashtra Weather Forecast After Diwali : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागांतून पावसाने पूर्णपणे माघार घेतली असून पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तवला आहे.११ नोव्हेंबर रोजी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी पावसाचा येलो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. दरम्यान, पुढील ४ ते ५ दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडीचा अनुभव येईल. मात्र, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम राहणार आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा