Monsoon Rain : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 3 दिवस कसे असेल हवामान?
Monsoon Rain Update News : गुरुवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पूर्व विदर्भात पावसाने जोरदार सरी कोसळल्या. यवतमाळ, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
राज्यातील काही भागांत पावसाने विश्रांती घेतली असली तर काही भागांत हलक्या सरी कोसळत आहेत. तर पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने 11 ते 14 जुलै दरम्यान विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.