esakal | राज्यात ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना अ‌ॅलर्ट जारी
sakal

बोलून बातमी शोधा

rain

राज्यात ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना अ‌ॅलर्ट जारी

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. मात्र, आता आणखी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा (low pressure area) निर्माण झाला आहे. येत्या २४ तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पुढील ३ ते ४ दिवस जोरदार वारे वाहतील. तसेच अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची (maharashtra rain) शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे.

हेही वाचा: Marathwada Rain: हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये जोरदार पाऊस

पुढील चार ते पाच दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. आज १२ सप्टेंबरला सातारा, पुणे, कोल्हापूर, पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट तर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदियाला यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी १३ सप्टेंबरला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट, तर मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. दरम्यान, १४ सप्टेंबरला पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट, तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, आणि अमरावती यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

loading image
go to top