esakal | Marathwada Rain: हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये जोरदार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

marathwada rain

२४ तासांत हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर होता

Marathwada Rain: हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये जोरदार पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात पावसाची कृपा झाली असून आकाशात पावसाचे ढग अद्यापही गडद आहेत. मंगळवारी ता. सात ) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर होता. या जिल्ह्यातील ५० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. नांदेड, हिंगोलीला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. लातूरमध्ये पावसाची मध्यम ते दमदार हजेरी लागली तर बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाचा जोर तुलनेने कमी होता.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात झालेल्या नोंदीनुसार नांदेड जिल्ह्यात २८ मंडळात अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्याच्या २० मंडळात तर परभणी जिल्ह्याच्या २ मंडळात अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी ९.२ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील सोयगाव तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ सिल्लोड तालुक्‍यात सरासरी १६.१ मिलिमीटर,कन्नड १६.९ मिलिमीटर, खुलताबाद तालुक्‍यात सरासरी १०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अन्य तालुक्‍यात सरासरी ९ मिलिमीटरच्या आतच पाऊस झाला. जालना जिल्ह्यात सरासरी १५.१ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी २६.७ मिलिमीटर त्यापाठोपाठ मंठा तालुक्‍यात १८.१ मिलिमीटर, जाफ्राबाद १७.१ मिलिमीटर, परतूर १५.४ मिलिमीटर, अंबड १३.३ मिलिमीटर तर इतर तालुक्‍यात सरासरी १२ मिलिमीटरच्या आतच पाऊस झाला.

या जिल्ह्यांतील ५० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली

या जिल्ह्यांतील ५० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली

बीड जिल्ह्यात जिल्ह्यात पावसाचा जोर कमीच होता. जिल्ह्यात सरासरी ७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील परळी तालुक्‍यात सरासरी १७.२ मिलिमीटर, अंबाजोगाई१४ मिलिमीटर, माजलगाव १३.३ मिलिमीटर, धारूर तालुक्‍यात सरासरी ११.२ मिलिमीटर तर इतर तालुक्‍यात सरासरी ८ मिलिमीटरच्या आतच पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात पावसाची हजेरी मध्यम ते दमदार स्वरूपाची राहिली. जिल्ह्यात सरासरी २१.१ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील लातूर तालुक्‍यात सरासरी २५ मिलिमीटर अहमदपूर ३०.९ मिलिमीटर, देवणी २५.५, शिरूर अनंतपाळ २५.९, जळकोट २६.३, चाकूर २३.३, उदगीर २३.९, निलंगा १४.५, तर औसा तालुक्‍यात सरासरी १२.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात सरासरी ६२.२ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील बारा तालुक्‍यात सरासरी ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. तर चार तालुक्‍यातील पावसाची सरासरी ४० मिलिमीटरपेक्षा जास्त राहिली. भोकर तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी १०४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ उमरी तालुक्‍यात ९७.९ मिलिमीटर, हदगाव तालुक्‍यात ९०.२ मिलिमीटर, अर्धापूर ८०.९ मिलिमीटर, बिलोली ७६.४ मिलिमीटर तर किनवट तालुक्‍यात सरासरी ७२.७ मिलिमीटर पाऊस झाला.

हेही वाचा: मराठवाड्यात पावसाचा हाहाकार! सहा दिवसांत ६६४ पशुधनांचा बळी

परभणी जिल्ह्यात सरासरी ३६.८ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात सरासरी २२.२ ते ४५.५ मिलिमीटर दरम्यान कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ६६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सेनगाव वगळता सर्वच तालुक्‍यात सरासरी ७२ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. हिंगोली तालुक्‍यात सरासरी ७२.१ मिलिमीटर, कळमनुरी ८१.३, वसमत ७३.६, औंढा ७७.६ मिलिमीटर तर सेनगाव तालुक्‍यात सरासरी ५९.८ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे पुन्हा एकदा सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. मंगळवारी दुपारपर्यंत मराठवाड्यातील अनेक भागात पावसाची अधूनमधून रिपरिप तर कुठे मध्यम ते दमदार हजेरी सुरूच होती.

जिल्हानिहाय पावसाची मंडळ (पाऊस मिलिमीटरमध्ये )
० नांदेड : नांदेड शहर (६६) , सगरोळी ( ८०.२५) , कुंडलवाडी (८९.७५) , अडमापूर ( ७६.७५) , लोहगाव ( ६७.२५ ) , रामतीर्थ ( ८३.५० ) , चांडोळ ( ७०.२५) , शेवडी ( ७५.२५ ) , तळणी ( ९७.२५) , निवघा ( ६८.२५ ) , मंठा ( १०४.२५) , तामसा ( १२२.७५ ) , पिंपरखेड ( १०५.७५ ) , आष्टी ( ७९.२५), भोकर ( १०३ ) , मोघाळी ( ९५.७५ ) , मातूळ ( १००.२५) , किनी ( ११९ ) , बोधाडी ( ७४.५०) , जलधारा (११७.२५) , शिवणी ( ११४.२५ ), हिमायतनगर ( ६८.७५ ) ,धर्माबाद ( ७६ ) , उमरी ( १०७.५० ) , गोळेगाव ( १०२.२५ ) , सिंधी ( ८४ ) , अर्धापूर ( १२८.५० ) , कुंटूर ( ६५ )

हेही वाचा: Rain Update: तुफानी पावसात औरंगाबाद शहरावर ढगफुटी!

परभणी : अडगाव ( ७४.५० ) , कुपटा ( ७७.७५ )
...
हिंगोली : नर्सी ( ७८ ) , सिरसम ( ८०.२५ ) , डिग्रस ( ६८ ) , माळहिवरा ( ८२.७५ ) , खांबाळा ( ७५.२५) , वाकोडी ( ६७.७५ ) , आखाडा ( ९१.७५ ) , डोंगरकडा ( १०८.७५) , वारंगा ( १३१ ) , वसमत ( ६७.७५) , अंबा ( ७९.५० ) , हयातनगर ( ६७.२५) , गिरगाव ( ७२.२५ ) , हत्ता (६६.५०) , टेंभुर्णी ( ७६ ) , कुरुंदा ( ८६ ), औंढा ( ९२.७५ ) , येहळेगाव ( ६८.२५ ) , साळना ( ६९.५०) , जवळा ( ७९.७५ ).

loading image
go to top