esakal | पुढील ४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईसह सात जिल्ह्यांना अलर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

IMD

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, सात जिल्ह्यांना अलर्ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा (maharashtra rain warning) इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची (maharashtra weather forecast) शक्यता आहे. त्यामुळे सात जिल्ह्यांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा: चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस..पाचव्यांदा पूर,संपर्क तुटला

राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, धुळे, रायगड या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील ३ ते ४ तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मुंबईमध्ये पुढील ३-४ तास मुसळधार पाऊस असेल. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले. त्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. मात्र, किनारपट्टीच्या भागाला या वादळाचा तडाखा बसला. सोमवारी उशिरा चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला. त्यानंतर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तसेच मराठवाड्यात पावसामुळे जवळपास ३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

'गुलाब'नंतर नव्या चक्रीवादळाची भीती -

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले असून सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे.

loading image
go to top