Maharashtra Weather Forecast : राज्यात गुलाबी थंडीचे आगमन, दिवाळीनंतर जोर वाढणार; जाणून घ्या तुमच्या भागात आज कसे असेल हवामान?

Temperature Drop : नोव्हेंबर सुरू झाल्यानंतर राज्यात थंडीचा प्रभाव हळूहळू वाढत असून सकाळी-रात्री गारवा जाणवत आहे. पुढील ४-५ दिवसांत किमान तापमानात २-३ अंश सेल्सिअसने घट होऊन थंडी आणखी वाढेल.
Maharashtra Weather Forecast: Dry Conditions Ahead

Maharashtra Weather Forecast: Dry Conditions Ahead

esakal

Updated on: 

राज्यात नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाल्यानंतर आता हळूहळू थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत असून, पहाटेच्या तापमानातही घट होताना दिसत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील आगामी हवामानाबाबत नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पुढील 4 ते 5 दिवसांत राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...