

Maharashtra is expected to experience dry and clear weather from November 9 to 11
esakal
Maharashtra Weather Forecast for November 9–11 : राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडीचा प्रभाव हळूहळू वाढताना दिसत आहे. दिवसाचे तापमान सध्या स्थिर असले, तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी गारवा वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील आगामी हवामानाबाबत नवीन अंदाज वर्तवला असून, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पुढील चार ते पाच दिवसांत राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा