

Maharashtra Weather Forecast for October 12
esakal
महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, उन्हाचा चटका आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक भागांत तापमानात वाढ होत असल्याने दुपारच्या वेळी उन्हाचा तीव्र त्रास जाणवत आहे. काही ठिकाणी बदलत्या हवामानासह वाऱ्याचा वेग वाढत असला, तरी बहुतांश भागांत कोरडे आणि उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, आज, १२ ऑक्टोबर रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, तापमानातील वाढ आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.