

Maharashtra Weather Forecast for October 22 and 23
esakal
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून, काही भागांत उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने उकाड्यात आणखी भर पडू शकते.