

Maharashtra Weather Forecast for October 6
esakal
Maharashtra Weather Forecast for October 6 : राज्यात सध्या बहुतांश भागांत पावसाने उघडीप घेतली असली, तरी काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर पावसाच्या सरींची शक्यता कायम आहे. दुसरीकडे, अनेक भागांत ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असून दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 6 ऑक्टोबरसाठी दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.