

महाराष्ट्रातील हवामानात सध्या संमिश्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज राज्यातील हवामान कसे राहणार, हे जाणून घेऊया.