Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain Forecast : मॉन्सूनने देशाच्या काही भागांतून माघार घेतली असून परतीचा प्रवास सुरू आहे. राज्यात बहुतांश भागांत ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ आणि उष्णतेचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Forecast: Yellow Alert in Several Districts

Maharashtra Weather Forecast: Yellow Alert in Several Districts

esakal

Updated on: 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा विजांसह पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आज (ता. २८) पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देत 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com