

Konkan, Central Maharashtra and Marathwada Weather Today
esakal
IMD Rain and Thunderstorm Alert for Maharashtra Districts : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळाची तीव्रता आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण कायम आहे. आज (४ नोव्हेंबर) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १२ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, तापमानातील चढ-उतारही कायम राहण्याचा अंदाज आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा