

Monsoon Withdrawal Continues in Maharashtra
esakal
Maharashtra Weather: October Heat Intensifies Across State : मॉन्सूनने राज्यातून परतीचा प्रवास सुरू केला असतानाच महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवू लागला आहे. आज, ७ ऑक्टोबर रोजी राज्यातील बहुतांश भागांत उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.