

Maharashtra Weather Forecast: Rain Likely in Several Districts
esakal
Maharashtra Weather Forecast: Rain Likely in Several Districts : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा विजांसह पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. आज, मंगळवार (ता. २९) रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.