

Maharashtra Weather Forecast: Thunderstorms Expected Today
esakal
Maharashtra Weather Forecast: राज्यात सध्या उन्हाचा चटका वाढत असतानाच वादळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. आज, सोमवार (२१ सप्टेंबर) राज्यातील अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचा घाटमाथा आणि सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असून, या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे.