Maharashtra Weather Update : दिवाळीत थंडीची चाहूल, राज्यातून पावसाची माघार; जाणून घ्या तुमच्या भागात आज कसे असेल हवामान?

IMD Forecast : राज्यातील एकाही जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केलेला नाही. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये कोरडे हवामान राहील; पावसाची शक्यता नाही.
IMD Forecast for Maharashtra on November 8

IMD Forecast for Maharashtra on November 8

esakal

Updated on: 

नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कधी उन्हाचा चटका, तर कधी थंडीचा हलका प्रभाव जाणवत आहे. दरम्यान, आज 8 नोव्हेंबर रोजी राज्यातील एकाही जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केलेला नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दिवसा काही भागांत उष्णता जाणवण्याची शक्यता असून रात्रीच्या वेळी हवेत गारवा अनुभवायला मिळणार आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...