

Maharashtra Weather Update
esakal
Maharashtra Rain Forecast : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओसरलेला पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज (ता. १२) पालघरसह ११ जिल्ह्यांना जोरदार सरी आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला असून, या भागांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.