

Maharashtra Weather Update for November 25
esakal
Why Cold Has Eased in Maharashtra : ‘अक्वान’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून, थंडीचा जोर कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी गुलाबी थंडी आता काहीशी ओसरली असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. दरम्यान, आज (ता. २५) राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा