
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांना मुसळधार पावसानं झोडपलंय. पण अद्याप मराठवाडा आणि विदर्भात पावसाने उघडीप दिलीय. विदर्भात तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. दरम्यान, हवामान विभागाने रविवारी राज्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट दिला आहे.