

राज्यात सध्या कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम असला तरी उर्वरित राज्यात अद्याप गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे. सकाळच्या वेळी हवेत गारठा जाणवत असला, तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. दरम्यान, आज (ता. २७) पूर्व विदर्भातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून, या भागात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा