IMD predicts rain in some areas of maharashtra : राज्यात गेल्या दिवसांपासून तापमान वाढ होताना दिसून येतो आहे. काही ठिकाणी पारा ४२ अंशापर्यंत पोहोचला आहे. विदर्भात पुढचे दोन दिवस उन्हाचा तडाखा जाणवणार असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यातील काही भागात पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.