

Cloudy skies over Maharashtra as winter fades, with IMD predicting rising temperatures and chances of light rain across Mumbai, Pune, Vidarbha, and Marathwada.
राज्यातील हवामान सध्या संक्रमणकाळातून वाटचाल करत असून, हिवाळ्याचा कडाका हळूहळू संपत चालला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज २७ जानेवारी रोजी मुंबई, नागपूरसह विविध भागांत दिवसभर उष्णता वाढेल, तर सकाळी हलकं धुके आणि काही ठिकाणी तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. थंडीचा प्रभाव कमी होत असल्याने रात्रीचा गारवा कमी जाणवेल, पण दुपारनंतर उन्हाचा चटका सहन करावा लागेल. पुढील २-३ दिवस तापमान स्थिर राहील, तरी हळूहळू उकाड्यात वाढ होईल. असा हवामान विभागाचा अंदाज आहे.