

Cloudy skies over Maharashtra leading to increased minimum temperatures, reducing night-time cold and creating humid winter conditions.
esakal
महाराष्ट्रात ढगाळ आणि पावसाळ्या सदृश हवामानामुळे किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे पहाटे आणि रात्रीचा गारठा कमी होऊन उकाड्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, आज (१४ जानेवारी) किमान तापमानातील ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे, तर उद्यापासून (१५ जानेवारी) ते हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे.