
Marathwada Weather Update
sakal
महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम असताना, पावसासाठी पोषक हवामान आहे. गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.