

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील तीन तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर रायगड ठाणे आणि पुणे घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पुणे जिल्ह्यातील मैदानी भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, दरम्यान आज दिवसभरात कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागांत मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.