Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

IMD Yellow Alert : महाराष्ट्रातून माघार घेतली असून, देशाच्या इतर भागांतूनही मॉन्सून परतण्याची प्रक्रिया सुरू आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, राज्यात ऑक्टोबर हीटचा प्रभाव कायम आहे.
Maharashtra Weather Update: October Heat Intensifies

Maharashtra Weather Update: October Heat Intensifies

esakal

Updated on: 

महाराष्टात ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला असून, उन्हाच्या तीव्र चटक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक भागातील कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. अमरावतीमध्ये राज्यातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, आज (११ ऑक्टोबर) कोकणातील सहा जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रातही उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com