
Cloudy skies over Maharashtra as heatwave persists and IMD issues rain alert for multiple districts during Diwali week.
esakal
Summary
पुण्यात कमाल तापमान ३२.३°से. आणि किमान १९.४°से. नोंदवले गेले.
हवामान तज्ञांच्या मते, थंडीची खरी चाहूल लागण्यासाठी तापमान अधिक खाली येणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांना विजांसह पावसाचा येलो अलर्ट जारी.
दरवर्षी दिवाळीआधी थंडीची चाहूल लागते, मात्र यंदा थंडीविनाच दिवाळी साजरी होत आहे. राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका कायम असून उकाडा वाढला आहे.अशातच वातावरण ढगाळ झाले असून पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्यातील अनेक भागांत आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे.