
राज्यात मागील दोन मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज (११) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.