Maharashtra Weather : थंडी गायब, कोकणात अवकाळीचा तडाखा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Maharashtra Weather Updates : हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाचा कडाकाही वाढल्यानं तापमानात मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
Weather Department Forecast for Vidarbha and Central Maharashtra

Weather Department Forecast for Vidarbha and Central Maharashtra

Esakal

Updated on

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून अनेक भागात ढगाळ वातावरण दिसून येतंय. नाशिकसह कोकणात रत्नागिरीत काही भागात पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाचा कडाकाही वाढल्यानं तापमानात मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत. वातावरणात होणाऱ्या अचानक बदलामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com