Yellow Alert in Marathwada
esakal
पुणे : राज्यात पुढचे चार दिवस विविध भागांत वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.