Maharashtra Weather Update: पुढील 24 तास अतिमुसळधार पावसाचे; IMD कडून या जिल्ह्यांना इशारा

Latest Maharashra news | मुंबईसह कोकणात आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे
Maharashtra Weather Update: पुढील 24 तास अतिमुसळधार पावसाचे; IMD कडून या जिल्ह्यांना इशारा
Maharashtra Weather Updatesakal
Updated on: 

Mumbai Weather Update: राज्यात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. याचे कारण म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये जारदार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे हा पाऊसाचा जोर आज आजूनच वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

मुंबई सह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दर्शवीला आहे. तर पुण्याला पण ऑरेंज अलर्ट दिला आहे.या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Maharashtra Weather Update: पुढील 24 तास अतिमुसळधार पावसाचे; IMD कडून या जिल्ह्यांना इशारा
Mumbai Pune Express Way Toll Rates: मुंबई- पुणे प्रवास महागणार? टोलच्या दरात मोठी वाढ होणार

रविवारी राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

याच बरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गडगडासह जोरदार पाऊसाची शक्यता आहे. किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे

Maharashtra Weather Update: पुढील 24 तास अतिमुसळधार पावसाचे; IMD कडून या जिल्ह्यांना इशारा
Mumbai Goa Block: मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या कसे असतील पर्यायी मार्ग?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

IMD weather forecast 29 September 2026 rain alert
Mumbai Rain
Yellow Alert in Maharashtra Districts
21 States Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com