Maharashtra Weather Update: विदर्भावर सूर्य कोपला, उष्णतेची भयंकर लाट येणार; पुढील तीन दिवस राज्यात कसे असेल हवामान?

Weather Update : अकोला शहरात सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सोमवारी करण्यात आली. तर नागपूर शहरात देखील तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. इतर जिल्ह्यातही ४१, ४२, ४३ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान आहे
Heat Wave
Heat WaveESakal
Updated on

Maharashtra Weather Update news : राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून विदर्भात सूर्य आग ओकू लागला आहे. अकोल्यात सर्वाधिक ४४. २ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी विदर्भातील पाच जिल्ह्यांना उष्णेतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com