

राज्यातील वादळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पूर्वमोसमी पावसाला अनुकूल हवामान स्थिती अद्याप कायम आहे. आज (मंगळवार, ता. ६) विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.