Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील हवामानात बदल; कोकण ते विदर्भात पावसाची शक्यता, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Bay of Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात आज (१ नोव्हेंबर) नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अर्णब निवळल्यानंतर दक्षिण अंदमान समुद्रातील कमी दाबाची तीव्रता वाढत असून प्रणाली २ नोव्हेंबरपर्यंत आंध्र किनाऱ्याजवळ येऊ शकते.
IMD Forecast for Konkan, Marathwada and Central Maharashtra

IMD Forecast for Konkan, Marathwada and Central Maharashtra

esakal

Updated on: 

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आज (१ नोव्हेंबर) नव्याने चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळी प्रणालीमुळे विदर्भासह राज्यातील काही भागांत पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, इतर जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...