
Weather Update : 'गारपीटीची भीती फक्त आजच्या दिवस'; राज्यभरातील अवकाळीबाबत जाणून घ्या तज्ञांचे मत
Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका आहे. हवामान विभागाकडून याबद्दलचे अलर्ट जारी करण्यात येत आहेत. दरम्यान राज्यात गारपीटीची भिती फक्त आजच्या दिवस असल्याचा अंदाज हवामान तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
माणिकराव खुळे हावामान तज्ञ (Retd.) आयएमडी, पुणे यांनी राज्यातील हवामानाबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येते पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे सोमवार दि.२० मार्चपर्यंत कोकण वगळता महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी वीजा आणि वारा यासहित किरकोळ पावसाच्या शक्यता आहे. त्या बरोबरच मध्य महाराष्ट्र(नंदुरबार ते सोलापूर), मराठवाड्यात ( छत्रपती संभाजीनगर ते नांदेड पर्यंत ) आज गारपीटीची शक्यता जाणवते, तर विदर्भात मात्र आजच्या बरोबर उद्याही गारपीट होवू शकते असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
सध्य:स्थित व्यापक प्रणालीमुळे सध्याचे पावसाळी ढगाळ वातावरण निवळणी(स्वच्छ होणे) यासाठी अजुनही ५ दिवस लागण्याची शक्यता जाणवते. कदाचित मंगळवार दि. २१ मार्च पासून वातावरण निवळेल, असे वाटते अशी माहिती देण्यात आली आहे
संपूर्ण महाराष्ट्रात येते काही दिवस दिवसाचे दुपारच्या कमाल तापमानात दोन डिग्रीने घसरण होण्याची शक्यता जाणवते व ही स्थिती पुढील ५ दिवस राहण्याची शक्यता जाणवते असे त्यांनी सांगितले.
राज्यातील अंदाज
पुढील ३-४ तासात रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नाशिक, जालना, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह ३०-४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वरे वाहतील. तसेच या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.