Maharashtra weather
esakal
Winter cold wave in Maharashtra is easing as minimum temperatures rise : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट बघायला मिळाली होती. विदर्भात तर पारा अगदी १० अंशाच्याही खाली आला होता. मात्र, आता ही थंडी ओसरताना दिसते आहे. उत्तरेकडील कमी झालेले थंड वारे आणि ढगाळ हवामान यामुळे राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे हवेतील गारठा देखील कमी झाल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी धुके आणि दव पडल्याचे दिसून येत आहे.