Pune and Nashik thunderstorm warning
esakal
Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता वाढू लागली असून हवामान विभागाने ३ जूनसाठी अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तब्बल १८ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.