
Winter Session 2022 : विधानभवनातील शिवसेना कार्यालयात कोण बसणार?; पॅसेजवरुन वाद होण्याची शक्यता
नागपूरः विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनामध्ये ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत.
नागपूरमध्ये विधानभवनामध्ये जे शिवसेनेचं कार्यालय आहे ते नेमकं कुणाला मिळणार? या कार्यालयात ठाकरे गटाचे नेते बसणार की शिंदे गटाचे? असा प्रश्न उपस्थित होत होता.
हेही वाचा: Elon Musk : मस्क यांच्याकडून राजीनाम्याचे संकेत? थेट ट्विटरवरुन विचारला प्रश्न
विधानभवनातील शिवसेना कार्यालयाची विभागणी झालेली आहे. या शिवसेना कार्यालयामध्ये चार रुम आहेत. त्यापैकी पहिल्या दोन रुम ठाकरे गटाला देण्यात आलेल्या आहेत तर इतर दोन रुम शिंदे गटाला मिळाल्या.
महत्त्वाचं म्हणजे या कार्यालयासमोर मोठा पॅसेज आहे, त्या पॅसेजची विभागणी झालेली नाही. त्यावरुन दोन्ही गटामध्ये तू-तू..मैं-मैं.. होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Karnataka Border Dispute : 'ही तर गळचेपी'; बेळगावातील मेळाव्याला ऐनवेळी परवानगी नाकारली
शिवसेनेचं नाव आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोग आणि न्यायालयात सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयात कोर्टाला हस्तक्षेप करण्यासाठी ठाकरे गटाकडून अपिल करण्यात आलेलं होतं. यासंदर्भातील सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे.